वारणा दूध संघामार्फत गणेशचतुर्थी निमित्त सभासदांना तूप वाटप – अध्यक्ष आम.विनय कोरे

वारणानगर /ता.१६ शिवकुमार सोने

येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे गणेश चतुर्थी-२०२० निमित्त संघाच्या सभासदांना तूप भेट देण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली.सोमवार दि.१७ ते दि.३१ ऑगस्ट या कालावधीत दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत सभासदांना तूप वाटप करण्यात येणार आहे. अध्यक्ष डॉ. कोरे म्हणाले, वारणा दूध संघाच्या अ वर्ग सभासदांनी शेअर्स पूर्ण केले आहेत. जे उत्पादीत दूधाच्या गावातील दूध संस्था संघास पुरवठा करतात. अशा अ वर्ग सभासदांसह ब वर्ग संस्था सभासद व राज्यभरातील क वर्ग ग्राहक सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, दिपावली सणांना सवलतीचे दरामध्ये तुप भेट म्हणून दिले जाते. दूध उत्पादक,सभासद, कर्मचारी यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना व उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे आमदार कोरे यांनी सांगितले.

संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थाच्याकडे सभासदांना दि.२१ ते ३१ या कालावधीत तूप वितरण केले जाणार आहे.याबाबतचे परिपत्रक देखील संघाने संबंधीत सर्व दूध संस्था व वितरण केंद्राना पाठविले असल्याचे सांगून कोल्हापूर व परिसरातील अ वर्ग, क वर्ग सभासदांच्या तूपाचे स्टेशन रोड कोल्हापूर येथील विक्री केंद्रातून सोमवारी वाटप सुरू राहणार असल्याचे सांगितले.कोव्हीड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सभासदांच्या सोईचे दृष्टीने कोल्हापूर येथील अ वर्ग व क वर्ग सभासदांसाठी सभासद यादी क्रमांकानुसार तूपाचे वाटप करण्यात येणार आहे.तूप घेतेवेळी सभासदांनी मास्क व सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करावे व आपले तूप घेवून जावे . असे आवाहन कार्यकारी संचालक श्री.येडूरकर यांनी केले.

दि.१७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सभासदांनी ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप घेवून जावावे.कोल्हापूर येथील सर्व सभासदांना पोष्टाव्दारे पत्रे पाठविली आहेत . तसेच मोबाईल वरुन एस.एम.एस. पाठविणेची व्यवस्थाही केली असून इतर शहरातील क वर्ग सभासदांची पत्रे ई- पोष्टाने पाठविली असून त्या – त्या शहरातील वितरकाकडे दि.२१ पासून तूप उपलब्ध होईल त्याठिकाणी आपले ओळखपत्र, अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप सभासदांनी घेवून जावे असे आवाहन संघाने केले आहे.

अ वर्ग सभासद यादी क्र. १ ते ५०० दि.१७ व १८ ऑगस्ट,अ वर्ग सभासद यादी क्र. ५०१ ते ११२४ दि.१९ व २० ऑगस्ट,तसेच कोल्हापूर येथील क वर्ग सभासद यादी क्र. १ ते ५०० दि.२१ ते २२,

क वर्ग सभासद यादी क्र. ५०१ ते १००० दि. २३ ते२४, क-वर्ग सभासद यादी क्र. १००१ ते १५०० दि.२५ ते २६, क वर्ग सभासद यादी क्र. १५०१ ते २००० दि.२७ ते २८ या मुदतीमध्ये तूप घेवून जावे . तसेच ज्या सभासदांना तूप घेता आले नाही . त्यांनी दि. ३० व ३१ या तारखेस कोल्हापूर विक्री केंद्रातून तूप देणेची व्यवस्था देखील संघाने केली आहे.

यावेळी संघाचे सचिव के.एम.वाले,अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंगचे एस.एल.मगदुम,अनिल हेर्ले,आर.व्ही.देसाई, संकलन विभागाच्या अर्चना करोशी, प्रशासनचे उत्तम कणेरकर,सचिन माने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!