वसई विरार मनपा क्षेत्रातील कोरोना संसर्ग भयानक

वसई /ताः २७ सुर्यकांत देशपांडे

        वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन ते बहुतांशि रहिवाशांच्या निष्काळजीपणातुन वाढताना दिसते. आत्तापर्यंत जवळजवळ६५,८४१ रुग्ण काल अखेर, संक्रमित झालेले आहेत त्या पैकी १११९० पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आता पर्यंत २२७ जणांचा मृत्यू झाला असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७२८६ आहे.
           वसई विरार महानगरपालिका क्षेत्र मोठे असून येथील विस्तारित वसाहतीमधील बाधित रुग्णांची माहिती त्वरित मिळणे . शक्य नसल्याने,संक्रमणाच्या व्यापकता अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील अनेक वसाहतीमध्ये अनेक बहुतांशी कष्टकरी व दैनंदिन व्यवसायावर अवलंबून असणारे रहिवाशी मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांचा कामानिमित्ताने, वाढता संपर्क पाहता लाँकडाऊन किंवा तत्संबंधी उपाय योजना बाबत प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याने दिवसेंदिवस येथील,वातावरण गंभीर आणि असुरक्षित बनत चालले आहे.
तसेच इतर रहिवाशांमध्येहि मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दिसून येत असल्याने,ते विचार घेता प्रशासनचेही या बाबीकडे डोळेझाक होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे

error: Content is protected !!