नाईट कॉलेजमध्ये जल जागृती सप्ताह

प्रतिनिधी इचलकरंजी

येथील खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधील ग्रीन क्लबच्यावतीने जल जागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालायत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
यामध्ये ‘जागतिक जल दिन आणि पाणी बचतीच्या व्यक्तिगत सवयीमध्ये बदल’ या विषयावर रील्स व शॉर्ट व्हिडिओ बनविण्याच्या स्पर्धा ग्रीन क्लब व सांस्कृतिक विभागाच्यावतीने घेण्यात आल्या. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे याच्या * हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य नारे यांनी महाविद्यालयातील तरुणांना पाणी बचतीचे महत्व सांगून त्याविषयी समाजात जाणीवजागृती करण्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक व स्वागत ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. अभिजीत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा, सौरभ पाटणकर यांनी केले तर आभार प्रा. एफ. एन. पटेल यांनी मानले.
तसेच ग्रीन क्लब, समाजशास्त्र विभाग आणि रिसर्च कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जल जागृती विषयी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाणी टंचाईच्या समस्येची तीव्रता दाखविणारे पोस्टर विद्यार्थ्यांनी तयार केले होते. विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. तुपे, डॉ. खानाज, डॉ. आर. एल. कोरे, अधीक्षक एस. एन. पटेल, डॉ. बिरनाळे, डॉ. मुंडकर, डॉ. सपकाळ, डॉ. पौडमल, डॉ. सय्यद, डॉ. प्रवीण पोवार, डॉ. सचिन चव्हाण, प्रा. प्रमोद काळे यांनी काम पाहिले. पोस्टर स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अभिजीत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एफ एन पटेल यांनी केले. आभार डॉ. जीवन पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!