नवे पारगाव /ता :२८- संदीप सोने
हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव येथील चावडीमागे राहत असणाऱ्या वृध्द इसमाचा मागील दोन दिवसापुर्वी कोल्हापूर सीपीआरला स्वॅब घेण्यात आला होता.मंगळवारी दुपारी हा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने वाठार व परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी वृध्द इसमाला धाप लागुन अस्वस्थ झाल्याच्या कारणावरून कोल्हापुर सीपीआर रूग्णालयात दाखल केले होते . तथापि त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने वृद्धाच्या राहत्या ठिकाणी व गल्लीत ग्रामपंचायत कोरोना समिती,संबंधित आरोग्य व पोलीस यंञणा सतर्कतेतुन आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसह फवारणी,व परिसर सील करणेची प्रक्रिया सुरू होती.
सदर वृध्द इसमाच्या प्रथम संपर्कातील आठ जणांना हातकणंगले येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरला पाठवण्यात आल्याचे भादोले आरोग्य केंद्राच्या डाॅ. एम. एम. उंब्रजकर-कुंभार यानी सांगितले.अन्य संपर्क बाधितांची यादी तयार करण्याचे काम संबंधित आरोग्य यंञणा, ग्रामपंचायत कोरोना समिती व वडगाव पोलीसांच्या वतीने युध्दपातळीवर सुरू आहे.वाठारमध्ये पहिल्यांदाच कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडल्याने गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तथापि नागरीकांनी घाबरून न जाता सुरक्षित घरी राहण्याचे आवाहन आरोग्य यंञणा, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दि.२९ ते शुक्रवार दि.३१ अखेर वाठार गावात कडकडीत लाॅकडाऊन जाहीर केले असुन या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे कोरोना दक्षता समितीच्या वतीने सरपंच किरण कुंभार यानी सांगितले.