आता देवेंद्र फडणवीस आरक्षण का देत नाहीत ? – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सांगत होते, मग आता ते आरक्षण का देत नाहीत. हे सरकार मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत. ते मुंबईत पोहचले तर काय स्थिती होईल याचा विचार गृहमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे. मराठा आंदोलकांना मुंबईत यावे लागत आहे हे सरकारचे पाप आहे.

राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी सगळे श्रीमंत लोक उपस्थित होते, पण गरिबांचे सरकारला काही पडले नाही, राम हा गरिबांचा सुद्धा आहे. हे सरकार लोकांना येड समजत आहे. पण आधी एकनाथ देवेंद्र यांचे ‘इडी’ सरकार होत, आता त्यात अजित पवारांचा ए जोडला गेल्याने हे ‘येडा सरकार’ आहे अशी बोचरी टीका पटोले यांनी केली.

error: Content is protected !!