लाकूड ओढणे शर्यतीत लहान गटात अनिकेत सुतार तर मोठ्या गटात मानव हणबर यांचा बैल प्रथम

आमदार प्रकाश आवाडे यांच्या 71 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत राहुल आवाडे युवा शक्ती, राहुल घाट आणि आवाडे समर्थक यांच्या वतीने आयोजित भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यतीत मोठ्या गटात मानव शुभम हणबर (29.2 सेकंद) आणि लहान गटात अनिकेत लक्ष्मण सुतार (30.3 सेकंद) यांच्या बैलांनी प्रथम क्रमांक मिळविला.


डीकेटीई नारायण मळा येथे या शर्यतीचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते लाकूड पुजन करुन करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी मैदानास भेट दिली. त्यांनी शर्यतप्रेमीबरोबर संवाद साधला. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे यांचा वाढदिवसानिमित्त फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला
लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन्ही गटात म्हणून 35 बैल सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- लहान गट : अनिकेत लक्ष्मण सुतार-प्रथम (30.3 सेकंद), रुपेश काशिनाथ बंडगर -द्वितीय (31.07 सेकंद), विजय तानाजी मोरे- तृतीय (32 सेकंद). मोठा गट : मानव शुभम हणबर-प्रथम (29.2 सेकंद), कृणाल सुभाष वाघमोरे- द्वितीय (30 सेकंद), राजाराम कृष्णा कोळकर-तृतीय (31 सेकंद). स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अहमद मुजावर, राहुल घाट, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, नरसिंह पारीक, संजय केंगार, सुभाष जाधव, शिवाजी काळे, प्रशांत कांबळे, किशोर पाटील, राजेंद्र बचाटे, तानाजी भोसले, बजरंग कुंभार, आरीफ आत्तार, संपत जामदार, अनिल शिकलगार, इरफान आत्तार, अशोक पुजारी, डॉ. विजय माळी, शांताराम लाखे, प्रकाश चौगुले आदींसह शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!