इंगळीत यांत्रिक बोट उपलब्ध ; पो.नि. राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते पुजन

इंगळी / ता : १०- वार्ताहर

            हातकणंगले येथे वारंवार पाठपुरावा करुन आणलेल्या यांत्रिक बोटीचे पूजन ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी त्यांच्याबरोबरच पत्रकार व नगरसेवक अमजद नदाफ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी य़ा बोटीतून पूरपरिस्थितीची पाहणी केली.

       आमदार राजूबाबा आवळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी काल तातडीने बोट उपलब्ध करुन दिल्याबद्ल त्यांचे आभार मानण्यात आले . सरपंच सौ शालिनी पाटील , सपोनि राजेंद्र मस्के,मंडळ अधिकारी अरुण पुजारी,तलाठी संतोष उपाध्ये,पोलीस पाटील जावेद मुल्ला,माजी सरपंच रावसाहेब पाटील,उपसरपंच सौ वैशाली मोरे , दादासो मोरे,ग्रामपंचायत सदस्य मियालाल पटेल,संदीप गुदले, सौरभ पाटील, बंडू पाटील,संतोष भातमारे,एक्स आर्मी चे अविनाश मायगोंडा, मा नगरसेवक अमजद नदाफ यांच्यासह आधार रेस्क्यू टीम टाकवडेचे संभाजी झूटाळ , प्रमोद पाटील , किरण पाटील सर्व सदस्य व इंगळी आपत्ती व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते. हुपरीचे अमजद नदाफ , नगरसेवक जयकुमार माळगे , पक्षप्रतोद रफिक मुल्ला , पत्रकार मुबारक शेख यानी यासाठी पाठपुरावा केला होता.

इंगळी येथे यांत्रिक बोटीचे पूजन करताना सपोनि राजेंद्र म्ह्स्के,मंडळ अधिकारी अरुण पुजारी,तलाठी संतोष उपाध्ये,पोलीस पाटील जावेद मुल्ला,माजी सरपंच रावसाहेब पाटील,यांच्यासह इतर मान्यवर.
                                                                   छाया:-राजेंद्र शिंदे इंगळी.

error: Content is protected !!