यशवंत हॉस्पिटलसाठी शासना कडुन व्हेंटिलेटर देणार – आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर )

वारणानगर /ता.१३-शिवकुमार सोने

      यशवंत हॉस्पिटल मार्फत समाजाच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेले कोवीड हॉस्पिटल कौतुकास्पद असून पन्हाळा तालुक्याला वरदान ठरणार असल्याचे गौरवोउद्गार काढून रुग्णांसाठी अत्यंत गरजेचे असलेले व्हेंटिलेटर देण्याचे अभिवचन राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) यांनी येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत येथे नव्याने सुरू केलेल्या अद्यावत शंभर बेडच्या डेडीकेटेड कोवीड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी दिले.

कोडोली (ता . पन्हाळा ) येथे यशवंत हॉस्पीटल मार्फत सुरू केलेल्या कोवीड सेंटरचे उद्घाटन करताना नाम . राजेंद्र पाटील-यड्रावकर व अन्य मान्यवर …

          मंत्री यड्रावकर म्हणाले , संस्थेचा इतर मेडिकल कॉलेज व मेडिकल फिल्डमध्ये काम करणाऱ्यांनी आदर्श घेवुन असे कोरोना हॉस्पिटल उभी करावीत. कोरोना टेस्टिंग वाढवून पन्हाळा तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी पन्हाळा तालुक्यात सर्व आरोग्याच्या सर्व सुविधा युद्ध पातळीवर राबिवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         संस्थेचे सचिव डॉ . जयंत पाटील म्हणाले की , ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत . या उद्देशाने कोविड हॉस्पिटल सुरू केले असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दर्शवून संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद गोडबोले यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, तहसीलदार रमेश शेडगे, उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी अमित माळी, मंडल अधिकारी अमित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोडोली उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रीनिवास अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंकर पाटील, डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्या सह नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित इंगवले यांनी केले.

error: Content is protected !!