हातकणंगले /ता :३

मा.सभापती ,
महिला बालकल्याण .
कोल्हापुर जिल्हा परिषदेमध्ये अनेक खलबते होऊन अखेर माणगाव (ता . हातकणंगले व हत्तीवडे (ता . आजरा ) या दोन गावांना समान 192 गुण मिळाल्याने सन 2018 -19 चा जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला . तर द्वितीय क्रमांक शिवारे (ता . शाहूवाडी ) गावास देण्यात आला . पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माणगावात झालेल्या विकास कामांना न्याय मिळाल्याची भावना व आनंद नागरिकांतुन व्यक्त होत आहे .
मात्र पुरस्काराची घोषणा होण्यापूर्वी जिल्हा परिषद मा. अध्यक्षा शौमिका महाडीक , जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व मा . उपसरपंच राजू मगदूम यांच्यात खडाजंगी झाली . अधिकाऱ्यांकडून बेरजेत झालेली चूक वादावादीसाठी कारणीभूत ठरली असल्याचे जिल्हा परिषदेत बोलले जात आहे .
जिल्हा परिषदेने सन २००४ या वर्षापासून यशवंत पुरस्कार योजना सुरू केली .योजनेमध्ये उत्कृष्ट ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते . पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकासाठी पन्नास हजार व तीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी व पदक या स्वरूपात देऊन गौरवण्यात येते .

सरपंच
मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत प्रस्तावाची तपासणी करून करावी .अशी सुचना जिल्हा परिषद मा. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिल्या होत्या . अधिकाऱ्यांकडून प्रस्तावांची पूर्ण पडताळणी केली . पण त्यामध्ये अधिकाऱ्यांकडून बेरीज मारताना चूक झाल्याने पुरस्कारास वादावादीचे गालबोट लागुन जिल्हा परिषदेमधील भोंगळ कारभार जिल्ह्याला समजला व वाद चव्हाट्यावर आला होता.दोन्ही ग्रामपंचायतीचे फेर मूल्यांकन करणेत आले.त्यामध्येही दोन्ही ग्रामपंचयतीना समान गुण मिळाले . त्यामुळे शेवटी माणगाव व हत्तीवडे यांना हा पुरस्कार विभागून देणेत यावा असा निर्णय झाला . व आज मुख्य कार्यकारी अमन मित्तल व जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी हा जुना एक वर्षापूर्वीचा वाद निकाली काढला .
माणगावची लोकसंख्या पंधरा हजार आहे . मोठ्या गावात पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रचंड मेहनत करावी लागते . पुरस्कारासाठी माणगावमधील लहान -मोठ्यांचे खेळाचे मैदान ,तलाव सुशोभीकरण , सर्व सोयींनीयुक्त स्मशानभुमी , भूमिगत गटर्स , हायमास्ट लाईट , लंडन हाऊस प्रतिकृती , सभागृह , घनकचरा व्यवस्थापन ,गावात सर्वत्र सीसीटीव्ही , नाना-नानी पार्क ,स्ट्रीट लाईट अशी अनेक विकासकामे यशवंत पुरस्कारासाठी तपासण्यात आली .

गटनेते, माणगांव
ज्या पुरस्कारासाठी भांडलो . तो पुरस्कार आज माझ्या गावाला विभागून मिळाला . माणगांवातील सर्वांनी केलेल्या विकासकामाचे चीज झाले . अखेर सत्याचा विजय झाला . यातुन संपूर्ण माणगाव ग्रामस्थांना एक प्रकारे न्याय मिळाला .