यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये “डिजिटल मार्केटिंग” आणि “शेअर मार्केट” या विषयाची कार्यशाळा

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने “डिजिटल मार्केटिंग” आणि “शेअर मार्केट” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील डीजी कारोबार मार्केटिंग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गणेश जाधव श्री. पंकज महाजन हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी भूषविले. कार्यशाळेस श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे-सावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कारजिन्नी यांनी शुभेच्छा दिल्या. तर वाणिज्य विभागातील विभागप्रमुख डॉ. आर. बी. बसनाईक , डॉ. आर. डी. लीधडे, श्रीमती माधुरी खुजट व डॉ. सी. आर. जाधव यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

प्रमुख वक्ते गणेश जाधव यावेळी बोलताना म्हणाले की, सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंगशिवाय पर्याय नाही, आपण जेंव्हा मोबाईल वापरतो तेंव्हा आपल्यावर डिजिटल जाहिरातीचा प्रभाव असतो. या कार्यशाळे मध्ये वेबसाईटचे व्हिजिटर कसे वाढवता येतील, सोशल मीडिया प्रमोशनद्वारे खऱ्या ग्राहकापर्यंत कसे पोहचायचे, ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटिंग यामधील नेमका फरक काय आहे हे समजण्यासाठी, फेसबुक, गुगल, यू ट्यूब, इंस्टाग्राम आणि नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स कसे काम करतात आणि त्याचा योग्य उपयोग आपल्या व्यवसायासाठी कसा करावा. या क्षेत्रातील संधी नेमक्या कोणत्या व कशा आहेत यावर त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल मार्केटिंगचे कॉन्टॅक्ट एखांद्या एजन्सीला दिल्यास त्याच्या कामाचा दर्जा कसा तपासावा ते समजण्यासाठी तसेच डिजिटल मार्केटिंगवरील गुंतवणुकीवरील परतावा कसा वाढावावा आदी प्रश्नांवर त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व शंकांना सहज, सोप्या भाषेत सांगत डिजिटल मार्केटिंगचे विस्तृत ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले.
दुसरे प्रमुख वक्ते, पंकज महाजन यांनी ” शेअर मार्केटकडे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.समाजामध्ये शेअर मार्केटकडे धोक्याचे क्षेत्र म्हणुन पाहिले जाते कारण आज एकूण गुंतवणूकदारापैकी केवळ नऊ टक्के गुंतवणूकदारच फायदेशीर व अतिरक्त उत्पन्न मिळवतात. पण अभ्यासपूर्ण मार्केट पद्धती नुसार दीर्घाकालीन गुंतवणूक केली तर हमखास नफा देणारे शेयर मार्केट हे क्षेत्र आहे. शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, इन्ट्राडे, फ्युचर ऑपशन्स, म्युच्युअल फंड्स या माध्यमातून गुंतवणूकीसाठी तसेच पूर्णवेळ करिअर करण्यासाठी प्रचंड संधी आहेत. ज्यांना नोकरी किंवा व्यवसाय व्यतिरिक्त वेगळा उत्पन्नाचा मार्ग हवा आहे त्यांनी जागरूक होऊन आतापासूनच शेअर मार्केटकडे ज्ञान मिळविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, ” तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने आज डिजिटल मार्केटिंग, ज्याला ऑनलाइन मार्केटिंग देखील म्हणतात, इंटरनेट आणि डिजिटल कम्युनिकेशनचे इतर प्रकार वापरून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी ब्रँडची जाहिरात केली जाते. यामध्ये केवळ ईमेल, सोशल मीडिया आणि वेब-आधारित जाहिरातींचा समावेश नाही तर मार्केटिंग चॅनेल म्हणून मजकूर आणि मल्टीमीडिया संदेश देखील समाविष्ट आहेत. या क्षेत्रात मार्केटिंग मॅनेजर, व्यवस्थापन सल्लागार, सोशल मीडिया व्यवस्थापक, जाहिरात व्यवस्थापक याचबरोबर अन्य संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये तरुणांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेली त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी देऊन शुभारंभ करण्यात आला. स्वागत-प्रास्ताविक प्रा.डॉ. आर. बी. बसंनाईक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सी. आर. जाधव यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन श्रीमती माधुरी खुजट यांनी केले. डॉ. आर. डी. लीधडे यांनी आभार मानले. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!