हातकणंगले तालुक्यात युवक राष्ट्रवादी युवा संवाद यात्रा काढणार: ॲड. राहुल आवळे

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन खोट्या फसव्या अफवा पसरवुन तरुणांची माथी भडकवण्याचा एक कलमी कार्यक्रम सत्ताधारी पक्ष करीत आहे. याला पायबंद घालण्यासाठी युवक जागा झाला पाहीजे . तसेच युवकांच्यामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे . याकरिता हातकणंगले तालुक्यात शरदचंद्र पवार युवक राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने युवा संवाद यात्रा काढणार असल्याचे नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष ॲड. राहुल राजीव आवळे यांनी रुई (ता . हातकणंगले) येथे पत्रकार परिषदेत सांगितले .
ॲड. राहुल आवळे यांनी पुढे सांगितले , महाराष्ट्रात वाढत चाललेली युवकांची बेरोजगारी , युवकांची व शेतकऱ्यांची होत असलेली फसवणुक , शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देणे. सत्तेचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचे प्रकार अशा ज्वंलत प्रश्रांची चर्चा करण्यासाठी व युवकांना संघटीत करण्यासाठी तालुक्यात युवा संवाद यात्रा काढणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेस माजी आम. राजीव आवळे , तालुकाध्यक्ष धनाजी करवते , विधानसभा अध्यक्ष वैभव कुंभार, युवक उपाध्यक्ष बाहुबली गाठ , लालित नवनाळे, प्रमोद देशपांडे , यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!