युवक राष्ट्रवादीकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

इस्लामपूर / ताः ५

       इस्लामपूर शहरात डेंग्यू व चिकन गुनियाची साथ जोमाने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूर नगर परिषदेने याबाबत तातडीने उपाय योजना कराव्यात . अशी मागणी केली आहे. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, व पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना हे निवेदन दिले आहे.
इस्लामपूर शहरात डेंग्यू, व चिकन गुनियाची साथ झपाटयाने वाढत आहे.

       शहरातील बऱ्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत आहेत. तसेच चिकन गुनिया सदृश्य रुग्णही आढळत आहे. काही महिन्या पूर्वी डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने इस्लामपूरवासीय अक्षरशः त्रस्त झाले होते. पुन्हा शहरातील नागरिकांच्यावर ही वेळ येवू नये. म्हणून नगर परिषदेच्या वेळीच या साथींच्या आजारांच्याबद्दल उपाय योजना कराव्यात असे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रसंगी कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, अभिजित पाटील,तन्वीर चाऊस, शिवराज पाटील,अभिजित कुर्लेकर,दादासो सूर्यवंशी, अभिजित रास्कर,सागर जाधव आदी शहर युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना निवेदन देताना शहराध्यक्ष सचिन कोळी. शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,अभिजित पाटील,तन्वीर चाऊस,शिवराज पाटील,अभिजित कुर्लेकर,दादासो सूर्यवंशी,अभिजित रास्कर,सागर जाधव व अन्य मान्यवर …..

error: Content is protected !!