झेले आय.टी.आय. मध्ये आज शिक्षक दिन साजरा

जयसिंगपूर /ता.५- प्रतिनिधी

    लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील श्रीमती विमल धनपाल झेले आय.टी.आय. मध्ये आज दि. 05 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर “Thank a Teacher” अभियान आयोजित केले होते.

  भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कोव्हीड -19 च्या प्रार्दुभावामध्ये शिक्षक On line पद्धतीने ज्ञानदानाचे काम करीत आहेत. संस्थेतील सर्व शिक्षकांचा Thank a Teacher अभियानाअंतर्गत संस्थेचे चेअरमन व नगरसेवक संजय पाटील (कोथळीकर ), यांच्या हस्ते व श्री. अजित रूकडे कमिटी सदस्य, प्र. प्राचार्य श्री.एस.बी.चौगुले तसेच पालक श्री. सचिन रायनाडे यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
  यावेळी संस्थेच्या सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले .

error: Content is protected !!