धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा: पालकमंत्री मुश्रीफ

विकासाची दृष्टी असलेला आणि खऱ्या अर्थाने मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवणारा युवा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्री . माने यांना पुन्हा खासदार करण्याचे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 

आळते (ता. हातकणंगले) येथे महायुतीच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, सोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुरेशराव हाळवणकर, अरुणराव इंगवले व अन्य मान्यवर..

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले, महिला व शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे . देशाला परदेशात सन्मान मिळवून देण्याचे आणि परदेशातील भारतीयांच्या हातात तिरंगा झेंडा उंचाविण्याची ताकद मोदींनी दिली आहे . मोदींना पंतप्रधान करणेसाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी खास. धैर्यशील मानेंना परत एकदा खासदार करणेचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खास . धैर्यशील माने , माजी आम. सुरेशराव हळवणकर, माजी जि .प . सदस्य अरुणराव इंगवले आदिनी मनोगत व्यक्त केले . आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर माजी . जि .प . अशोकराव माने यांनी आभार मानले .
मेळाव्यास वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके , जवाहरचे व्हा. चेअरमन् बाबासाहेब चौगुले, वारणा संघाचे संचालक अरुण पाटील , बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले , अशोक पाटील, संभाजी पोवार, बबलु मकानदार, आळतेचे उपसरपंच अमित पाटील हातकणंगलेचे भाजपचे सर्व नगरसेवक , यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!