अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल : रोहीणी साळुंके

हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न

हातकणंगले/ प्रतिनिधी
लोकसभेची निवडणुक भयमुक्त व्हावी. निवडणुकीच्या प्रचारामध्ये वैयक्तीक टिकाटिप्पणी करू नये. सोशल मिडीयावर सायबर विभागाकडुन लक्ष ठेवले जाणार आहे . जातीय तेढ निर्माण होईल , असे कोणतीही वादग्रस्त पोष्ट टाकु नये . अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल . असा इशारा जयसिंगपुर विभागाच्या डीवायएसपी रोहीणी साळुंके यांनी दिला . हातकणंगले पोलीस स्टेशनच्या आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

डीवायएसपी रोहीणी साळुंके यांनी पुढे सांगितले, एप्रिल महिन्यामध्ये रामनवमी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , रमजान ईद सारखे अनेक धार्मिक सण, सामाजिक उत्सव व जयंत्या साजऱ्या होणार आहेत . ते सर्व सामाजिक कार्यक्रम शांततेत पार पाडावेत . तसेच मिरवणुकीसह सर्व कार्यक्रमांसाठी रात्री दहा पर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे .
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले, धार्मिक सणांच्या व जयंतीच्या मिरवणुका काढताना प्रत्येकांनी पुर्व परवानगी घेणे गरजेचे आहे . धार्मिक स्थळ अथवा मंदिरासमोर मिरवणुक रेंगाळुन देवु नये . डॉल्बीचा वापर टाळा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल . सर्वांनी जातीय सलोखा ठेवला पाहीजे . तसेच निवडणुकीमध्ये मतदान शांततेत पार पाडा . व आचारसंहितेचे काटेकोर पालन करा .
बैठकीस माजी जि.प. सदस्य बबलु मकानदार, माजी सभापती अविनाश बनगे, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब शिंगे, बाळगोंडा पाटील , स्वामीसर् , सुधीर मोघे, डी.जी. वायदंडे, शिरीष थोरात यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!