हातकणंगलेचा निकाल महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरणार : प्रा. सोमनाथ साळुंखे

हातकणंगले/प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १३०० बुथ कमिट्या तयार केल्या आहेत.
गाव तिथे शाखा सुरु झाल्याने कार्यकर्त्यांचे जाळे संपुर्ण महाराष्ट्र भर विस्तारले आहे. प्रस्थापित राजकारण्याच्या विरोधात वंचित विकास आघाडी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहील्याने डी. सी. पाटील यांचा विजय हा निश्चित आहे. हातकणंगलेचा निकाल हा संपुर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरणार आहे. असा विश्वास वचिंत बहूजन आघाडीचे राज्य प्रर्वतक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केला. हातकणंगले येथील वचिंत बहूजन आघाडीच्या परिचय मेळाव्यात ते बोलत होते .
प्रा. साळुंखे पुढे म्हणाले, विद्यमान खासदारांच्या वरील नाराजी व शेट्टी जनतेच्या विश्वासास पात्र राहीले नाहीत . त्यामुळे जनता आता वंचितच्या डी .सी . पाटील यांच्या मागे उभी राहील. महाराष्ट्रात ४८ पैकी १५ खासदार वंचितचे निवडून येतील .प्रकाश आंबेडकर यांना लोकशाहीचे सामाजिकीकरण करणेचे आहे . तेही नुसते बोलायचे नसुन करून दाखवायचे आहे .
उमेदवार डी .सी . पाटील यांनी सांगितले, बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी देवुन अल्पसंख्याक समाजास न्याय देण्याचे काम केले आहे. अन्यायाविरुद्ध न्यायाचे व्यासपीठ मिळवुन दिले आहे .

जि .प . अध्यक्ष पदाच्या कारर्किदी मध्ये चांगले काम करून नेत्यांनी मला वंचित ठेवले आहे . निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाविरुद्ध अथवा व्यक्तीविरुद्ध टिका करणार नसुन वंचितची भुमिका पटवुन सांगितली जाईल.
बैठकीस जिल्हा प्रभारी डॉ. कांतीताई सावंत, जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे , दयानंद कांबळे, महासचिव पुंडलिक कांबळे, सिद्धार्थ कांबळे, महादेव कुंभार, इंद्रजीत घारे, युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदे, जयश्री कांबळे, वासंतीताई म्हेतर,मच्छिंद्र कांबळे, गौतम दिवाण यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!